Back
r-b-shirke-high-school-logo

मुख्याध्यापकांचे मनोगत

सस्नेह नमस्कार,

रत्नागिरीच्या शैक्षणिक वाटचालीत आपले नाव अधोरेखित करणा-या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा. भा. शिर्के प्रशाला ही कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य व नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणा-या या प्रशालेच्या प्रांगणात बालवर्गापासून १२ वी पर्यंत सुमारे २५०० विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

सन १९४८ साली संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांनी दूरदृष्टीने टयुटोरियल स्कूल चालविण्यास ताब्यात घेतले. त्यावेळी कै.रामदास भाऊसाहेब शिर्के यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून टयुटोरियल स्कूलचे नामकरण रा. भा. शिर्के प्रशाला असे करण्यात आले. आज शाळेने सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत जनमानसात आपला वेगळा ठसा उमटवल्याचे आपण अनुभवत आहोत. याचे सर्व श्रेय प्रशालेचे सन्माननीय संस्थापक, आजवरचे सर्व पदाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जागरुक पालक, उदार देणगीदार, गुणवंत विदयार्थी हितचिंतक या सर्वांना जाते.

शालेय, शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने मिळणारे सुयश हे प्रशालेचे आणखी एक प्रमुख वैशिष्टय. इ.१०वी च्या बोर्ड परीक्षेत सतत ९०% च्या वर निकाल आणि बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये झळकणारे विदयार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेत, एन.एम.एम.एस. परीक्षेत मोठया संख्येने गुणवत्ता यादीत स्थान पटकावणारे विदयार्थी, याशिवाय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, ऑलिम्पियाड, गणित प्रज्ञा शोध परीक्षा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमधील यश ही शाळेची परंपराच आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणारा विद्यार्थी याच प्रशालेचा. तसेच इ.१०वी च्या बोर्डाच्या परीक्षेत तीन भाषा विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम येऊन एक लाख रुपयांचे नीळकंठ खाडिलकर पारितोषिक मिळविण्याचा इतिहास याच प्रशालेतील विदयार्थ्याने रचला आहे.

साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियानात कोल्हापूर विभागात पहिल्याच वर्षी सर्वप्रथम आणि रत्नागिरी जिल्ह्यात सतत तीन वर्षे शाळा प्रथम आली आहे या सर्वांचे उत्तम उदाहरण आहे.

सुसज्ज प्रयोगशाळा, ड्रॉईंग रुम, कॉम्प्युटर रुम, आय.सी.टी. प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय आणि सौ. विजयालक्ष्मी मलुष्टे रंजन मंदिर, प्रशस्त असे कै. भाऊसाहेब देसाई क्रीडांगण, तंत्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन इ.९वी-१०वी तील विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल विषय घेण्याची व्यवस्था ही प्रशालेची खास वैशिष्टये आहेत.

क्रीडा क्षेत्रात शाळेने कायम वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शाळेच्या प्रशस्त क्रीडांगणावर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत. प्रशालेच्या दोन विदयार्थिनी शिवछत्रपती क्रीडापुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत. जानकी पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देखील क्रीडापटूंनी मिळविले आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत रौप्यपदकांची कमाईदेखील विदयार्थिनींनी केली आहे.

दिल्ली येथे होणा-या आर. डी. परेडसाठी सलग दोन वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य प्रशालेला लाभले आहे.

ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्प हे शाळेचे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पाऊल. डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, सी.ए., वकील, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, गायक, वादक, नृत्यांगना, अभिनेते पासून नासासारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून देखील प्रशालेचे विद्यार्थी कार्यरत आहेत. असे विविध क्षेत्रात कार्य करणारे अनेक उत्तमोत्तम यशवंत विद्यार्थी शाळेने घडविले आहेत. अनेक विद्यार्थी देश-विदेशातही उच्च पदांवर कार्यरत आहेत. ही गौरवास्पद गोष्ट आहे. या सर्वांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

१९४८ च्या इवल्याशा रोपटयाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आता तंत्रज्ञान युगाकडे वाटचाल करताना, बदलत्या काळाला सामोरे जाण्यासाठी अजुनही विविधांगांनी शाळेला सुसज्ज करण्यासाठी आपण सर्वांनीच सज्ज होऊ या.

चला तर मग या ज्ञानयज्ञात आपलीही ‘समिधा’ अर्पण करण्यासाठी एकत्र येऊ या.

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक

राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक हे शाळेचे भूषण आहे. प्रशालेतील पाच शिक्षकांचा शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.

  • कै. लक्ष्मण गणेश पटवर्धन (पहिले मुख्याध्यापक) १९७१-७२
  • कै. अशोक भास्कर कदम १९९४-९५
  • श्री. सदाशिव सिताराम चावरेकर २००३-०४
  • श्री. नथुराम तानाजी देवळेकर २०११-१२
  • श्री. विनोद शशिकांत मयेकर (क्रीडा) २०१८-१९

आतापर्यंत प्रशालेस विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे -

राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक हे शाळेचे भूषण आहे. प्रशालेतील पाच शिक्षकांचा शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.

  • माध्यमिक शालांत परीक्षा गुणवत्ता यादी – १६
  • शिष्यवृत्ती परीक्षा – ८०५
  • एन.एम.एम.एस.-३९
  • एलिमेंटरी / इंटरमिजिएट- १३७९
  • डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक – ०९
  • राष्ट्रीय खेळाडू – ११८
  • आंतरराष्ट्रीय खेळाडू – ०४

प्रशालेचे विविध विभाग

competative-exam

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी): ह्या परीक्षांचे आयोजन ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’ यांचेमार्फत करण्यात येते. ही शासकीय स्वरूपाची परीक्षा असून इ. ५वी व इ. ८वी तील विद्यार्थ्यांना या परीक्षांकरिता बसविण्यात येते. प्रत्येक विषयासाठी प्रशालेतून अतिरिक्त (जादा) तासिकांचे नियोजन करून यानुसार नियमितपणे मार्गदर्शन करण्यात येते.

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा: मुंबई विज्ञान शिक्षक मंडळामार्फत या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही खाजगी स्वरूपाची परीक्षा असून इ.६वी आणि ९वी करिता घेण्यात येते. विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन संशोधक वृत्ती वाढविणे हा या परीक्षेमागील मुख्य हेतू आहे. लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व तोंडी परीक्षा अशा चार टप्प्यात ही परीक्षा घेतली जाते. ऐच्छिक स्वरूपाची परीक्षा असून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना विभागामार्फत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यात येते.

SOF Examination: SCIENCE OLYMPIAD FOUNDATION मार्फत इ.५वी ते इ.१०वी करिता NSO, IMO, IEO इ. परीक्षांचे आयोजन करण्यात येते. ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरुपाची परीक्षा आहे. या मध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, कम्प्युटर आणि सामान्य ज्ञान इ. विषयांचे पेपर येतात. यासाठी प्रशालेमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.

BDS परीक्षा: शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्व तयारी होण्याकरिता इ.५वी व इ.८वी करिता ह्या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ही खाजगी स्वरूपाची परीक्षा असून या परीक्षेमधून स्पर्धा परीक्षेची तयारी होण्याकरता मदत होते. विद्यार्थ्यांना जादा मार्गदर्शन करण्यासाठी जादा तासिकांचे नियोजन करण्यात येते.

NMMS परीक्षा: शासनामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. इ.८वी साठी ही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून ज्या पालकांचे वार्षिक उत्पन रु. एक लाख पन्नास हजार पर्यंत आहे अशा पालकांचे पाल्य या परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ शकतात. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना इ.९वी ते इ.१२वी पर्यंत केंद्र सरकारची रु.१२०००/- प्रतिवर्षी शिष्यवृत्ती प्राप्त होते.
या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती परीक्षेनुसार स्वतंत्र जादा तासिकांचे वेळापत्रक बनवून जादा मार्गदर्शन करण्यात येते. या परीक्षेसाठी मानसिक क्षमता कसोटी (बुद्धिमता) गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे हे विषय असतात.

रा.भा.शिर्के प्रशालेच्या इतिहासात नियमितपणे वर्षभर चालू असलेला आणि सलग ५६ वर्षे कार्यरत असलेला विभाग म्हणजे गरीब विद्यार्थी निधी विभाग होय.

प्रशालेत शिकणाऱ्या परिस्थितीने गरीब; परंतु हुशार, होतकरु विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या प्रगतीस हातभार लावला जातो. वह्या, पुस्तके, गणवेश, कंपासपेटी, ST बस पास शुल्क, SSC बोर्ड परीक्षा शुल्क आणि शालेय परीक्षा शुल्क अशा विविध माध्यमातून ही मदत करण्यात येते. प्रतिवर्षी सुमारे शंभर विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात.

या निधीसाठी विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्त यथाशक्ती मदत करतात. शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक हेही त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी देणग्या देतात.

आजवर हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला या विभागातर्फे हातभार लावण्यात आला आहे. हेच विद्यार्थी त्यांच्या नंतरच्या यशस्वी करियरमध्ये आठवणीने या निधीत सातत्याने देणग्या देऊन भर घालीत आहेत.

Garib Vidyarthi Nidhi
Science Dept

प्रशालेच्या विज्ञान विभागामार्फत खालील उपक्रम राबविण्यात येतात व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याची संधी दिली जाते.

  1. शासकिय विज्ञान प्रदर्शने
  2. शासकिय विज्ञान मेळावा
  3. विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा
  4. शालांतर्गत विज्ञान प्रदर्शन
  5. वैज्ञानिक नाटिका
  6. शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विज्ञान विषयक प्रभातफेऱ्या
  7. तालुका–जिल्हा-राज्य-राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभाग
  8. AWIM (A WORLD IN MOTION) महिंद्रा अँड महिंद्रामार्फत घेण्यात येणारे प्रदर्शन व स्पर्धा
  9. FINOLEX मार्फत घेण्यात येणारे विज्ञान प्रदर्शन इ.अशा विविध उपक्रमात प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक भाग घेत असतात

आजपर्यंत तालुका स्तरावर (शासनामार्फत आयोजित केले जाणारे) विज्ञान प्रदर्शनात प्रशालेची १२ वेळा निवड झाली, जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात ०८ वेळा निवड झाली व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ०२ वेळा निवड झाली आहे.

प्रशालेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र असे तीन स्वतंत्र विभाग असलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये इ. 5वी ते इ. 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रयोगाचे मार्गदर्शन व दिग्दर्शन केले जाते.

प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, वैज्ञानिक VIDEOS दाखवण्यासाठी LCD स्क्रीन, प्रोजेक्टर, स्पिकर, अॅम्प्लीफायर इ.साधने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे प्रयोग करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, त्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळावा ह्या दृष्टीने प्रयोगशाळेत दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त शालेय विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. ज्यामध्ये शाळेतील इ. ५वी ते १०वी पर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात.

Science Lab
inspire-manak

केंद्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ‘इन्स्पायर ॲवॉर्ड मानक’ या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थी सहभागी होतात. नावीन्यपूर्ण संकल्पना विद्यार्थी मांडतात व त्यातील उत्कृष्ठ संकल्पनांची शासनामार्फत निवड केली जाते. अशा निवडक विद्यार्थ्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त होते. या रकमेतून विद्यार्थी नावीन्यपूर्ण, समाज उपयोगी अशा वैज्ञानिक साहित्य प्रतिकृती तयार करतात.

सदर स्पर्धेत इ.६वी ते इ.१० वीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. शालेयस्तरावर IDEA COMPETITION घेण्यात येऊन त्यातील निवडक विद्यार्थ्यांचे INSPIRE AWARD MANAK ह्या स्पर्धेसाठी नामांकन करण्यात येते.

देशाच्या सर्व भागांमध्ये नवनवीन वैज्ञानिक संकल्पना आणि उद्योजकतेचा प्रसार करण्यासाठी भारत सरकारने नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोवेशन मिशन (AIM) या प्रमुख उपक्रमाची स्थापना केली आहे.

AIM या संस्थेमार्फत र.ए.सोसायटीच्या रा.भा.शिर्के प्रशालेला अटल टिंकरिंग लॅब मंजूर झाली आहे. AIM या संस्थेच्या माध्यमातून अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांसाठी ELECTRONICS DEVELOPMENT, ROBOTICS, INTERNET, MECHANICAL, SPACE SCIENCE, 3D PRINTING या क्षेत्रांचे मार्गदर्शन केले जाते. ATAL LAB अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते व अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर प्रशालेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध उपकरणांची निर्मिती करतात व विविध स्पर्धामध्ये सहभागी होतात.

ATAL Tinkering lab
Library

प्रशालेचे ग्रंथालय विविध प्रकारच्या ग्रंथांनी समृध्द आहे. अनेक प्रकारचे संदर्भ ग्रंथ यामध्ये मराठी विश्वकोष (सर्वखंड), संस्कृतीकोश, शिल्पकार, चित्रकोश, लीलावती, तुकाराम गाथा, कुमार विश्वकोश, जागतिक वैज्ञानिक कोश, चिल्ड्रेन्स एन्सायक्लोपिडीया, पु.ल.देशपांडे यांची भरपूर पुस्तके, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ग्रंथसंपदा व इतर अनेक मान्यवर लेखकांची पुस्तके, वैज्ञानिक ग्रंथ, चित्रकला, नाटक, प्रवास वर्णन, ऐतिहासिक पुस्तके, इंग्रजी, हिंदी अशी सर्व प्रकारची पुस्तके व विपुल असे बालवाडःमयाने ग्रंथालय समृध्द आहे.

ग्रंथालयात एकूण १३५०० पुस्तके आहेत. विद्यार्थी ग्रंथालयाचा लाभ उत्तम प्रकारे घेतात. दरवर्षी जास्त पुस्तके वाचणा-या विद्यार्थ्यांसाठी ‘कै. चंद्राबाई गीते वाचक पुरस्कार’ दिला जातो.

दरवर्षी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन दि.१५ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध उपक्रमानी साजरा केला जातो. दरवर्षी २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. संस्कृत दिनानिमित्त संस्कृत ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले जाते.

प्रशालेत अनेक वर्षांपासून व्यवसाय मार्गदर्शन विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी विविध करियर, अभ्यासशाखा, स्पर्धा परीक्षा व शिष्यवृती इत्यादी विषयांची माहिती देण्यात येते.

विविध क्षेत्रातील यशस्वी तसेच तज्ज्ञ व्यक्तींना प्रशालेत मार्गदर्शक म्हणून बोलाविण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. या विभागांतर्गत क्षेत्र भेट तसेच कल चाचणीचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याना व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत विविध उपक्रमांसाठी प्रशालेत आवर्जून निमंत्रित करण्यात येते. व्यवसाय सर्वेक्षण आणि मुलाखत या प्रकल्पांतर्गत अनेक विद्यार्थी माहिती संकलन आणि विश्लेषण हे उपक्रम हाती घेतात. ONLINE व OFFLINE या दोन्ही माध्यमातून या विभागाचे काम चालते.

Carrier Guidence (2)
Drawing room

कलादालन- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कला विषयाच्या अध्यापनात कलादालनाची उपयुक्तता ओळखून संस्थेमार्फत स्वतंत्र कला वर्गाची निर्मिती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन कला संचालनालयामार्फत घेतली जाणारी चित्रकला ग्रेड परीक्षा प्रशालेतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होतात. एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेच्या उत्तम निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. A श्रेणी व B श्रेणी धारक विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात असते. या परीक्षेसाठी इ.८वी-इ.९वी मधील विद्यार्थी प्रविष्ठ होतात. या विद्यार्थ्यांसाठी शालेय वेळापत्रकातील तासिकांव्यतिरिक्त ज्यादा तासिका घेऊन मार्गदर्शन केले जाते.

शासकीय चित्रकला स्पर्धेबरोबर सामाजिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या चित्रकला, मूर्तिकला, पोस्टर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी प्रशालेतर्फे देण्यात येते.

प्रशालेतर्फे दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन कालावधीत विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामाचे (चित्रांचे) प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन त्याच बरोबर कार्यानुभव अंतर्गत टाकाऊपासून टिकाऊ हस्तकला प्रदर्शन भरवण्यात येते.

प्रशालेचा क्रीडा विभाग विविध क्रीडा साहित्याने परिपूर्ण असून विद्यार्थ्यांना खालील क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. सदर क्रीडा प्रकारांसाठी प्रशालेतील तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

  1. क्रीडा प्रकार – खो-खो, क्रिकेट, बास्केटबॉल, फुट्बॉल, व्हॉलीबॉल, चेस, कराटे, तायक्वॉन्दो, कॅरम, अॅथलेटिक्स, तलवारबाजी, धनुर्विद्या, स्विमिंग, ज्युडो इ.
  2. उपक्रम:- खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, चेस, कॅरम, कराटे, तायक्वॉन्दो इ. खेळांची शिबिरे आयोजित केली जातात. विविध खेळांची ऑनलाईन / ऑफलाईन आणि प्रात्यक्षिकाद्वारे माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येते. प्रशालेच्या विस्तीर्ण पटांगणावर तसेच छ.शिवाजी महाराज स्टेडियम येथे विविध खेळांचा सराव नियमितपणे करुन घेण्यात येतो.
  3. रीडांगण माहिती :- शाळेला दर्शनी भागाकडे ४० मीटर X ८० मीटर क्रीडांगण लाभले आहे, तर शाळेच्या इमारतीच्या मागे ३० मीटर X १८ मीटर आकाराचे बास्केटबॉल बॉल मैदान आहे. यात अनेक खेळांचा सराव केला जातो.
  4. शाळेची उल्लेखनिय कामगिरी:-
    1. रत्नागिरी जिल्ह्यात खेळात सर्वाधिक गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम (सलग १५ वर्षे) शासनाचे प्रोत्साहनात्मक क्रीडा अनुदान प्राप्त झाले आहे.
    2. जिल्हास्तरीय खेळाडू: ३५०० (विविध क्रीडा प्रकारात )
    3. तालुकास्तरीय खेळाडू: २००० (विविध क्रीडा प्रकारात )
    4. राज्यस्तरीय खेळाडू: १५०० (विविध क्रीडा प्रकारात)
    5. राष्ट्रीयस्तर खेळाडू : १२० (विविध क्रीडा प्रकारात)
    6. आंतरराष्ट्रीय खेळाडू : ०५ (खो-खो, क्रिकेट, योगासने, कॅरम)

अनेक माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक खेळांकरिता गणवेश, क्रीडा साहित्य, स्पर्धेकरिता प्रवास खर्च, नाश्ता व भोजन खर्च या स्वरूपात मदत करतात.

Backyard-Basketball-Court
Competition Dept

प्रशालेचा अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजे स्पर्धा विभाग. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत स्पर्धा विभाग कार्यरत आहे. विद्यार्थी राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व शालेयस्तरावर विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करतात आणि शाळेला गौरव प्राप्त करून देतात.

स्पर्धांचे स्वरूप – वक्तृत्व स्पर्धा, निबंधस्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, घोषवाक्य तयार करणे स्पर्धा, किल्ला बनविणे स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पठण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, पोस्टर्स तयार करणे स्पर्धा अशा विविध स्पर्धा विभागामार्फत घेण्यात येतात.

प्रशालेत अनेक वर्षे स्काऊट गाईड विभाग कार्यरत आहे. दरवर्षी स्काऊट गाईड कार्यालयामार्फत जिल्हा व तालुकास्तरीय शिबीर भरवण्यात येते. अनेक EVENTS या शिबिरामध्ये आयोजित केले जातात. यामध्ये प्रशालेचे स्काऊट गाईड्स अव्वल कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी करतात. यातून विद्यार्थ्यांना सक्षम व स्वावलंबी बनवले जाते.

प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी (स्काउट / गाईड) राज्य पुरस्कार परीक्षेला बसून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत प्रशालेला सन्मानाची पंतप्रधान ढाल आणि राष्ट्रपती पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे तसेच आत्तापर्यंत प्रशालेतील ३७ विद्यार्थी राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रशालेतील स्काऊटर गाईडर यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळेच हे शक्य होत आहे. रत्नागिरी जिल्हा स्काऊट गाईड संस्थेचे सचिव म्हणून प्रशालेतील शिक्षकांनी सलग पंधरा वर्षे नेतृत्व करून भरीव कार्य केले आहे. अनेक शिक्षकांनी या संस्थेच्या अनेक पदांवर कार्य केले आहे.

Scout Guide
SSC Exam

निकाल - सन १९७५-७६ पासून

No.

Name of the Student

Year

Rank

Marks

Percent

No. of studennt

 

Merit Holders

 

School

Board

 

 

Appeared

Passed

Result (%)

1

 

1975-76

 

 

 

 

104

58

55.77

2

Padmsudha Vishwanath

1976-77

Ist

 

601/700

85.86%

131

45

34.35

3

Sudhir Salavi

1977-78

Ist

 

504/700

72.00%

175

58

33.14

4

Mahesh A.Mohite

1978-79

Ist

 

602/700

86.00%

175

64

36.57

5

Savita G.Golam

1979-80

Ist

 

605/700

86.43%

201

81

40.30

6

Ravindra N. Katkar

1980-81

Ist

15th

638/700

91.14%

187

89

47.59

7

Nilima M Mayekar

1981(oct)

 

6th

517/700

73.86%

 

 

 

8

Varsha S.Thanedar

1981-82

Ist

 

618/700

88.29%

192

108

56.25

9

Vinayak K.Kale

1982-83

Ist

 

621/700

88.71%

207

100

48.31

10

Jyoti A.Deolekar

1983-84

Ist

16th

636/700

91.14%

220

125

56.82

11

Varsha K.Kelkar

1983-84

 

H-Sk Prize

 

 

12

Vijaya V.Shenai-Lanjekar

1984-85

Ist

 

604/700

86.29%

128

79

61.72

13

Shirish V.Shenai-Lanjekar

1985-86

Ist

 

625/700

89.29%

135

93

68.89

14

Swati P.Deodhar

1986-87

Ist

19th

637/700

91.00%

173

112

64.74

15

Deepak B.Bane

1987-88

Ist

 

621/700

88.71%

131

98

74.81

16

Santosh V.Desai

1988-89

Ist

 

631/700

90.14%

176

117

66.48

17

Gurudatta R.Bagave

1989-90

Ist

 

600/700

85.71%

201

138

68.66

18

Seema G.Narvekar

1990-91

Ist

 

634/700

90.57%

186

120

64.52

19

Sachin V.Sakpal

1991-92

Ist

12th

646/700

92.29%

215

152

70.70

20

Girishkumar K.Kadam

1992-93

Ist

13th

646/700

92.29%

217

158

72.81

 

Girishkumar K.Kadam

1992-93

 

Ist in Skt

97/100

 

 

Girishkumar K.Kadam

1992-93

 

Ist in BC

 

 

21

Gouri Shrikant Nadkarni

1993-94

Ist

 

637/700

91.00%

208

144

69.23

22

Anjali Shankar Nikam

1993-94

 

Ist in Skt

98/100

 

23

Kalyani Vijay Aathale

1994-95

Ist

8th

655/700

93.57%

237

173

73.00

24

Prasad Anil Chitre

1994-95

Ist

19th

644/700

92.00%

25

Vikrant Laxman Landage

1995-96

Ist

18th

665/750

88.67%

212

164

77.36

26

Preeti Subraya Shenoy

1996-97

Ist

 

659/750

87.87%

197

153

77.66

27

Aniruddha Vijay Joshi

1997-98

Ist

 

659/750

87.87%

221

155

70.14

28

Veda Keshav Bhat

1997-98

 

Ist in Skt

98/100

 

29

Aasakti Avinash Vaidya

1998-99

Ist

 

651/750

86.80%

266

191

71.80

30

Varad Rajan Sakhalakar

1999-00

Ist

28th

661/750

88.13%

257

212

82.49

31

Manjiri S.Patwardhan

2000-01

Ist

 

664/750

88.53%

250

194

77.60

32

Vidyasagar R.Gogate

2001-02

Ist

12th 

692/750

92.27%

263

206

78.33

33

Aaditi Shrikrishna Damale

2002-03

Ist

 

676/750

90.13%

252

240

95.24

34

Abhishek Ajit Kadam

2003-04

Ist

 

686/750

91.47%

260

233

89.62

35

Amruta S.Vijapurkar

2004-05

Ist

 

670/750

89.33%

251

221

88.05

36

Neha Devendra Bhongale

2005-06

Ist

22nd

692/750

92.27%

243

223

91.77

 

 

 

Merit list Closed

 

 

 

 

37

Manasi S. Patwardhan

2006-07

Ist

 

592/650

91.08%

245

232

94.69

38

Siddhi Shrikant Athalye

2007-08

Ist

 

602/650

92.61%

286

270

94.40

39

Surekha Zilaji Kokare

2008-09

Ist

 

617/650

94.92%

262

237

90.45

40

Uma Anil Salavi

2009-10

Ist

 

530/550

96.36%

284

259

91.20

41

Harshada Vijay Khandekar

2010-11

Ist

 

531+19/550

100.00%

296

265

89.53

Konkan Board 

42

Kaustubh Vijay Bagav

2011-12

Ist

 

526/550

95.64

277

265

95.67

43

Mayuri Bharat Bhuvad

2012-13

Ist

 

536/550

97.45

270

265

98.15

44

Prachi Diliprao Umak

2013-14

Ist

 

491/500

98.20

291

290

99.66

45

Tejas D Bandbe

2014-15

Ist

 

482/500

96.40

216

216

100.00

46

Tejas D Sakhalkar

2015-16

Ist

1st in 3 Langs.in state

495/500

99.00

297

292

98.32

47

Shrirang D Rayarikar

2016-17

Ist

 

495/500

99.00

284

283

99.65

48

Atharv Vaibhav Kanitkar

2017-18

Ist

 

477/500

95.40

261

259

99.23

49

Prachi D Bhitale

2018-19

Ist

 

482/500

96.40

308

283

91.88

50

Yasharaj Suhas Rane

2019-20

Ist

 

499/500

99.80

299

299

100.00

51

Kamble Vaibhav Babasaheb

2020-21

Ist

 

484/500

96.80

273

273

100.00

प्रशालेला प्रज्ञावंत गुणवंत विद्यार्थ्यांची यशोदायी परंपरा लाभली आहे. उत्तमोत्तम उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या कृतियुक्त अध्यापनाने उत्तम निकाल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे. रत्नागिरीच्या शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करून प्रशालेला विशिष्ट उंचीवर राखण्यात सातत्य ठेवलं आहे. या प्रशालेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करीत आहोत धन्यवाद !

संपर्क

रत्नागिरी शिक्षण संस्थेची,

रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी,

शिवाजी नगर, जुना माळ नाका, बोर्डिंग रोड, रत्नागिरी

Per.Recognition No.1(a) dated 5/12/60 Ratnagiri, School Index No. 25.08.004