Back

सस्नेह नमस्कार,
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस आणि
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे-
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय

आणि

गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय( स्वायत्त) -रत्नागिरी
आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत आहेत.

सोबत सविस्तर पत्रक पाठवत आहोतच.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या महाविद्यालयाच्या संघाचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे.

स्पर्धेचे विषय-

वरिष्ठ गट – ( वेळ- 7+3 = 10 मिनिटे)

१. अंतरी सदभाव असेल जागृतI
तरी यंत्र हित स्वामी म्हणे II
( संजीवनी गाथा अभंग ८१)

२. बदललेली जीवनशैली :भौतिक चंगळवाद की आधुनिकता

३. नवीन शैक्षणिक धोरण: अपेक्षा आणि वास्तव

कनिष्ठ गट- ( वेळ- 6+2 = 8 मिनिटे )

१. स्वामी म्हणे झाले, कृतार्थ जीवन I
सद्गुरु चरण उपासीता (संजीवनी गाथा मंगलाचरण श्र्लोक ८)

२.स्वच्छता आणि शांतता यांचे जीवनातील महत्त्व

३. तीर्थक्षेत्रांची सामाजिक भूमिका

पारितोषिके

वरिष्ठ गट

🥇 प्रथम क्रमांक -7000₹
🥈 द्वितीय क्रमांक – 5000₹
🥉 तृतीय क्रमांक – 3000₹

🎖️ उत्तेजनार्थ – 2 बक्षिसे🎖️
प्रत्येकी 1000₹

कनिष्ठ गट-

🥇 प्रथम क्रमांक – 7000₹
🥈 द्वितीय क्रमांक –  5000₹
🥉 तृतीय क्रमांक – 3000₹

🎖️ उत्तेजनार्थ – 2 बक्षिसे🎖️
प्रत्येकी 1000₹

महत्वाचे नियम

◼️ प्रत्येक महाविद्यालयातील कनिष्ठ गटातून तीन स्पर्धकांचा आणि वरिष्ठ गटातून तीन स्पर्धकांचा असे दोनच संघ सहभागी होऊ शकतात.

◼️ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक आणि विनामुल्य असुन स्पर्धकाने प्राचार्यांचे संमतीपत्र आणि ओळखपत्र यांसह आवश्यक ती सर्व माहिती देवनागरी लिपीत खाली दिलेल्या लिंकवर भरावी.

◼️ परीक्षण प्रक्रिया पुर्णपणे तज्ञ परीक्षकांच्याच हाती असुन , परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

◼️ Registration link 10 December 2023 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

Registration link

https://forms.gle/Gph4Xkxx2WUF4c2N6

धन्यवाद.

प्रा.मानसी गानू
📲 7083111479

प्रा.अभिजित भिडे
📲 9527457265